मुंबई : यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज 'स्कायमेट' या हवामानविषयक कंपनीने अंदाज व्यक्त केला आहे. यंदा 109 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे. 


'स्कायमेट' ही एक खाजगी कंपनी आहे. स्कायमेटने व्यक्त केलेल्या सुधारीत अंदाजानुसार, काही वर्षांच्या तुलनेत यंदा अधिक पाऊस पडणार आहे. कंपनीने यंदाच्या मोसमातील मासिक पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.