मुंबई : खासदार किरीट सोमय्यांनी मित्रपक्ष शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. महापालिक निवडणूक स्वबळावर जिंकणार असल्याचा त्यांनी इशारा दिला आहे. मुंबई महापालिकेतली आरक्षण सोडत जाहीर होते न होते तोच शिवसेना आणि भाजपमधला सत्तासंघर्ष विकोपाला जातांना दिसतोय. 


महापालिकेत शिवसेनेनं तयार केलेला माफियांचा अड्डा उद्ध्वस्त करू असं स्फोटक विधान आज भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केलं आहे. शिवाय यंदाच्या निवडणूकीत स्वबळावर मित्रपक्षांना सोबत घेऊन बहुमताची सत्ता आणू दाखवण्याचा विश्वासही सोमय्यांनी व्यक्त केला आहे. सोमय्यांनी केलेल्या विधानावर शिवसेनेत बडे नेत्यांनी अ्द्याप कुठलही प्रतिक्रिया दिलेली नाही.