एमपीएससीचा निकाल जाहीर, नाशिकचा भूषण अहिरे राज्यात पहिला
महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य सेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य सेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.
संपूर्ण निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नाशिकचा भूषण अहिरे हा उमेदवार, संपूर्ण राज्यातून पहिल्या क्रमांकाने राज्य सेवा परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. उपजिल्हाधिकारी संवर्गासाठी त्याची निवड झाली आहे.
तर अमोल ठाकूर हा उमेदवार पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त संवर्गात राज्यातून पहिला आलाय. राज्य सरकारच्या सेवेतल्या विविध अ आणि ब वर्गाच्या पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती.
.