मुंबई : विमानतळावर ४४ लाखाचे परदेशी चलन कस्टम विभाग अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. ही कारवाई करताना तिघांना अटक करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटाबंदीच्या निर्णयाला५० दिवस पूर्ण होत असताना रोख रक्कम जप्त करण्याचा सिलसिलाही सुरुच आहे. मुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणात परदेशी चलन जप्त करण्यात आले. विमानतळावरुन कस्टम विभागाने तब्बल ४४ लाखाचे परदेशी चलन जप्त केले.


यात सौदी, यूएई आणि ऑस्ट्रेलियन चलनाचा समावेश आहे. कस्टम विभागाला या संदर्भात माहिती मिळाली होती. स्पाईस-जेटच्या विमानाने शेख वाहिद अली, मोहम्मद सोहेल आणि शेख युसूफ पाशा हे हैदराबादवरुन मुंबईला येणार होते अशी माहिती कस्टम विभागाला मिळाली होती. 


त्यानुसार सापळा रचून कस्टम विभागाने ही कारवाई केलीय. य़ा तिघांनाही पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरोधात फेमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.