मुंबई : राज्य सरकारची मंजुरी मिळताच महालक्ष्मी इथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं पार्क उभारण्यात येईल, असं आयुक्त अजोय मेहता यांनी स्पष्ट केलं आहे. महालक्ष्मी इथे रेसकोर्सच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचं उद्यान बांधण्याचा प्रस्ताव तयार नाही, पण पार्क उभारण्याच्या महापौरांच्या पत्रासह अहवाल राज्य सरकारला पाठवला आहे असं मेहता यांनी स्पष्ट केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचे खासदार नगरसेवक राहुल शेवाळे यांनी महापालिकेत ठरावाची सूचना मांडून रेसकोर्सचा भूखंड महापालिकेच्या ताब्यात घेण्याची मागणी केली होती. त्यावर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी त्यावर अभिप्राय दिला आहे.


रेसकोर्स मैदान रॉयल वेस्टर्न इंडिया टर्प क्लब या कंपनीला ९९ वर्षाच्या लिजवर दिला होता. त्यांचा लिज करार ३१ मे रोजी संपुष्टात आला आहे. त्याच दरम्यान महापौर स्नेहल आंबेकर यांनी रेसकोर्सवर थीमपार्क उभारण्यासाठीचे पत्र दिले आहे. त्यामुळे कंपनीबरोबर नव्याने लिज करार करायचा का थीमपार्क उभारायचे याचा सल्ला घेण्यासाठी राज्यशासनाला अहवाल पाठविण्यात आला आहे.