मुंबई : मुंबईतील खोतांच्या जमीनीवर अवैध कब्जा मिळवल्या प्रकरणी चौकशी करा असा आदेश मुंबई हायकोर्टानं मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. ४५० एकर जमीनीचं हे प्रकरण असून यांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांच्या पवार चॅरिटेबल ट्रस्टचाही समावेश आहे अशी याचिका भूषण सामंत यांनी केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक मोठ्या बिल्डर्सचाही यांत समावेश आहे. खोत Abolition Act १९४९ अंतर्गत खोतांच्या जमीनी सरकारकडे जाणं अपेक्षित असताना त्या जमीनी बळकावण्यात आल्या, असा आरोप याचिकेत करण्यात आला होता. तसंच सरकारही या जमीनी परत मागत नसल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. चौकशीचे आदेश देऊन ही याचिका निकाली काढण्यात आली आहे.