COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : दादर स्टेशनजवळ पश्चिमेला नक्षत्र सिनेमासमोरील श्रीकृष्णची लस्सी लोकप्रिय आहे. एका अरुंद बोळवजा जागेत आडव्या बाकांवर लोक लस्सीची चव चाखताना दिसतात.


या लस्सीवर मलई टाकली जाते, आणि मग ही लस्सी एक-एक ग्राहकांसमोर नेली जाते, आणि या लस्सीची चव चाखण्यासाठी वाट पहाणाऱ्यांचे हात आपोआप लस्सी घेण्यासाठी पुढे सरसावतात आणि २० ते २५ लस्सीचे ग्लास हातोहात खपतात.


 यानंतर ५ ते १० मिनिटांनी पुन्हा लस्सी येते, बदलतात फक्त लस्सी चाखणारे ग्राहक, मात्र या लस्सीची चव अजूनही बदलेली नाही. उन्हाळ्यात तर अशा लस्सीचा आस्वाद घ्यायलयाच हवा.