मुंबई : पालिका निवडणुकीआधी मनसेने आक्रमकपणा स्वीकाललाय. नागरिकांसाठी आंदोलन करण्याचा सपाटा चालवलाय. कांदिवली येथील MCA चे मैदान मनसेने आज स्थानिकांना खुले करुन दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महावीर नगर येथील हे खेळाचं मैदान MCA ला नाममात्र दराने भाड्याने दिले आहे. मात्र सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येकी 2 तास हे मैदान स्थानिक रहिवाशांना उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा नियम असताना MCA व्यवस्थापन तो पाळत नसल्याची तक्रार होती. त्यामुळे मनसेने आंदोलन करून  मैदान खुले केले.


MNS चे कार्यकर्ते कांदिवली MCA ग्राऊंग मध्ये घुसले आणि क्रिकेट खेळ सुरू केला. सर्वसामान्यना हे मैदान खेळासाठी उपलब्ध होत नव्हते. महापालिकेचे मैदान असूनही स्थानिकांना मज्जाव होत होता. अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात या ठिकाणी करण्यात आला आहे.