मुंबई : बॉम्ब हायकोर्टने विचारलं आहे, यू-ट्यूब काय आहे, आणि ते कसं काम करतं? यू-ट्यूब पब्लिक प्लॅटफॉर्म आहे का? तसेच ऑनलाईन कंटेट कसं काम करतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हायकोर्टाने हे प्रश्न तेव्हा विचारले जेव्हा, डिसेंबर २०१४ मध्ये व्हिडीओ शेअरिंग वेबसाईट यू-ट्यूबवर एआयबीने रोस्ट कार्यक्रम अपलोड केला, त्यावर वाद निर्माण झाल्यानंतर, दाखल झालेल्या जनहित याचिकेवर कोर्टात सुनावणी सुरू आहे. लॉ कॉलेजची फॅकल्टी शर्मिला घुगे यांनी एआयबी विरोधात याचिका दाखल केली होती.


याचिकेत अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि करण जोहर तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अश्लीलता आणि अश्लील सामुग्री फैलावण्याचा आरोप करण्यात आला आहे.


न्यायमूर्ती आर व्ही मोरे आणि जस्टीस व्ही एल अचलिया यांच्या बेंचसमोर घुगे यांच्या वकिलांनी सांगितलं की, ऑनलाईन माध्यमातून अश्लील सामुग्री फैलावण्यावर गाईडलाईन जारी करायला हवी.


आम्ही फक्त कोर्टाला याबद्दल सांगू इच्छीतो की, आम्ही कुणाच्या विरोधात नाहीत, घुगे यांचे वकिल महेश जेठमलानी यांनी म्हटलंय की, याबाबत यू ट्यूबने या आधीच इशारा दिलेला असतो. करण जौहर यांचे वकील शिरीष गुप्ते यांनी सांगितलंय की वेबसाईट पहिल्यांदा वयाबद्दल माहिती घेते.