बंद दाराआड बायका नाचवणं गुन्हा नाही - हायकोर्ट
बंद प्लॅटमध्ये बायका नाचवणे, त्यांच्यावर पैसे उडवणे, नाचणाऱ्या बायकांशी अश्लील वर्तन करणे याप्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकत नाही.
मुंबई : बंद प्लॅटमध्ये बायका नाचवणे, त्यांच्यावर पैसे उडवणे, नाचणाऱ्या बायकांशी अश्लील वर्तन करणे याप्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकत नाही.
नुकतंच, अशाच एका प्रकरणी १३ जणांवर नोंदवलेला गुन्हा मुंबई हायकोर्टानं रद्द केलाय. गेल्या वर्षी अंधेरीमधल्या एका फ्लॅटमध्ये एक खाजगी पार्टी सुरू होती. तिथे महिला बिभत्स कपडे घालून नाचत असल्याचा प्रकार समोर आला होता.
या प्रकराची एका पत्रकारानं तक्रार केली आणि पोलिसांनी तिथे छापा टाकला. मात्र, बंद प्लॅट हे सावर्जनिक ठिकाण होऊ शकत नाही. तिथे कोणालाही प्रवेश दिला जात नाही. एखाद्या गृहनिर्माण सोसायटीतील खाजगी प्लॅट ही संबंधिताची खाजगी मालमत्ता असते. तसंच या प्लॅटमधून गाण्यांचा आवाज बाहेर येत नव्हता. त्यामुळे कुठल्याही कलमाखाली यासंदर्भातला गुन्हा नोंदवता येणार नाही, असं कोर्टानं स्पष्ट केलं.