मुंबई : कचरा प्रश्नावरुन मुंबई हायकोर्टानं मुंबई आणि पुणे महानगर पालिकेला खडसावलंय. ओला आणि सुका कचरा वेगळा करा, असे निर्देश हायकोर्टानं मनपा प्रशासनाला दिलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्याबाबत हाऊसिंग सोसायट्या, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि खाद्यपदार्थ उत्पादक कंपन्यांना दोन आठवड्यांत निर्देश जारी करा, असं हायकोर्टाने खडसावलंय.


पुण्यातील सामाजिक कार्यकर्ता डॉ. मधुसूदन मोडक यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. घन कच-याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात नसल्याचा आरोप होता. त्यावर  हायकोर्टानं निर्देश दिलेत.