मुंबई : निवासी डॉक्टरांना मुंबई हायकोर्टाने अतिशय कडक शब्दात फटकारलं आहे. न्यायालयाने सुरूवातीला निवासी डॉक्टरांची बाजू व्यवस्थित ऐकून घेतल्यानंतर फटकारलं आणि निवासी डॉक्टरांच्या संपावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई हायकोर्टाने निवासी डॉक्टरांना म्हटले आहे, मारहाणीची भिती वाटत असेल तर निवासी डॉक्टरांनी नोकरी सोडून द्यावी, एखाद्या कामगाराप्रमाणे वर्तन हे डॉक्टरी पेशालाही काळीमा फासणारे आहे. जे डॉक्टर ऐकत नसतील त्यांची नावे आम्हाला सांगा, असंही हायकोर्टाने म्हटलं आहे.


जे निवासी डॉक्टर सुरक्षेशिवाय कामावर येत नाहीत, त्या संबंधित हॉस्पिटलने निवासी डॉक्टरांना कायमचे सुट्टी पाठवायचे, किंवा कामावरून काढून टाकायचे, हे हॉस्पिटल अंतर्गत निर्णय घेऊन ठरवावे असं न्यायालयाने म्हटलं आहे.


मुंबई हायकोर्ट उद्या या याचिकेवर सविस्तर निर्णय देणार आहे. धुळे, नाशिकनंतर काही ठिकाणी डॉक्टरांना मारहाण झाल्यानंतर, दोन दिवसांपासून राज्यातील निवासी डॉक्टर संपावर आहेत.