मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने फुटपाथवरील फेरीवाल्यांची गर्दीवरून मुंबई महापालिकेला फटकारलं आहे. मुंबईचे फूटपाथ फेरीवाल्यांनी भरलेले आहेत, मात्र कारवाई करण्यात पालिका अपयशी असल्याचं म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एवढंच नाही तर मुंबई उच्च न्यायालयाचे महापालिकेवर ताशेरे ओढले आहेत. मुंबईकरांना चालण्याजोगे मोकळे रस्ते कधी मिळणार?, असा संतप्त सवाल न्यायालयाने केला आहे. 


मुंबईत अनेक ठिकाणी फेरीवाल्यांमुळे फूटपाथवर पायी चालताना अडचणी येतात, फुटपाथवरील फेरीवाल्यांचीही मोठी दादागिरी पादचाऱ्यांवर वाढत चालली आहे. मात्र याविषयी पालिका अधिकारी कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीत.