मुंबई : दोन दिवसांपासून मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख तलावांपैकी चार तलाव भरलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुळशीनंतर विहार, मोडकसागर आणि तानसा धरण भरून वाहू लागला. मोडकसागरचे दोन दरवाजे उघडण्यात आलेत. त्यामुळे ४४ गावांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय.


सात तलावांपैंकी चार तलाव आत्तापर्यंत भरले आहेत. या अगोदर १९ जुलैला तुलशी तलावही भरला आहे. 


गेल्या २४ तासांत मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळं एकाच दिवसात ७३ हजार दशलक्ष लीटर पाणी क्षमता वाढली आहे. तलाव भरत आल्यानं पाणी टंचाईची चिंता मिटली आहे.