मुंबई : येत्या वर्षभरात मुंबईकरांना लोकल रेल्वेमध्ये मोफत वायफाय मिळण्याची शक्यता आहे. लोकलबरोबर मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्येही वायफायची सुविधा देण्याबाबत विचार सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सुविधेसाठी रेल्वे मंत्रालयाच्या रेलटेल कंपनीनं पुढाकार घेतला आहे.. सध्या देशातल्या प्रमुख रेल्वे स्टेशन्सवर वायफाय सुविधा पुरवण्याचा प्रकल्प राबवला जातोय. हीच संकल्पना पुढं नेत मुंबईकरांना लोकलमध्येदेखील वायफाय पुरवण्याची मोहीम लवकरच सुरू होऊ शकते. 


त्याबरोबरच देशभरातल्या 100 प्रमुख मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्येही वायफाय सुविधेसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखण्यात येणार आहे. पीपीपी तत्त्वावर हा प्रयोग राबवला जाईल. वायफाय्प्रमाणं सीसीटीव्हीदेखील लोकल, मेल आणि एक्सप्रेसमध्ये बसवले जाणार आहेत.