मुंबई : गोरेगावमधील भाजपच्या संकल्प मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री शिवसेनेला उद्देशून म्हणाले, तुमचं आमचं नात हिदुत्वाचं होतं, आणि २५ वर्ष आमची सडली नाहीत, तर २५ वर्षाचं नुकसान या मुंबईचं झालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री यापुढे बोलताना म्हणाले, 'या २५ वर्षात आम्हाला एक धडा दिला, कुणाही सोबत फरपटत जाऊ नका, कुणासोबतही फरपटत गेलात, तर तुमचं नुकसान आहे, हे मुंबईचं नुकसान आहे. 


मुख्यमंत्री सलग बोलताना म्हणाले, परिवर्तन अटळ आहे, या ठिकाणी परिवर्तन होणार आहे, ही तूतू मैमैची लढाई नाही, ही जुगलबंदीची लढाई नाही. त्यांचे वैचारीक आमचे शत्रू नाही, शिवसेनेशी आमची लढाई आचाराची आहे, यात आमचा विजय होणारच आहे.'