मुंबई : महापालिकेत गैरकारभार, भ्रष्टाचार हा जणू अधिकारच बनून गेला आहे. कचरा वाहतूक कामामध्ये कंत्राटदारांच्या फायद्यासाठी जादा फे-या दाखवून बिले मंजूर करणे, लॉगशीटवर खोट्या नोंदी करणे, अशा प्रकारचा गैरकारभार होत असल्याचे झी २४ तासने समोर आणला. 


८ डिसेंबरच्या स्थायी समितीतही हा मुद्दा चर्चेला आला होता. तेव्हा पालिका प्रशासनाने याची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु चौकशी तर दूरच राहिली उलट अद्यापही त्याच जोमाने हा गैरकारभार मागील पानावरून पुढे सुरू आहे असल्याच झी 24 तासच्या तपासात पुढे आलंय.