भाजप आमदाराच्या कार्यालयाची मनसैनिकांकडून तोडफोड
मुंबई : राज ठाकरे यांनी पहिल्यांदा स्वत: रिक्षा जाळून दाखवावी, मग कार्यकर्त्यांना सांगावं, असं वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार योगेश सागर यांच्या कार्यालयामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज तोडफोड केली.
राहुल बजाज यांच्या फायद्यासाठी फडणवीस सरकारने 70 हजार रिक्षांचे परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नवीन परवान्याच्या रिक्षा रस्त्यावर दिसल्यास त्या जाळा, अशी चिथावणी राज ठाकरे यांनी दिली होती. मनसेच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त षण्मुखानंद हॉलमधील कार्यक्रमात ते बोलत होते.
राज ठाकरेंच्या या विधानावर कांदिवलीच्या चारकोपमधील भाजप आमदार योगेश सारग यांनी प्रतिक्रिया देत, राज यांनी पहिल्यांदा स्वत: रिक्षा चालवावी, असं आव्हान दिलं. त्यानंतर मनसेने खळ्ळ खट्याक स्टाईलने आमदार सागर यांच्या कार्यालयाची तोडफोड केली.