मुंबई : भाजपनं मुंबई महानगरपालिकेतल्या एन वॉर्डमध्ये प्रभाग क्रमांक १३२ मधून, पराग शहा या गडगंज श्रीमंत उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. पराग शहा यांची एकूण मालमत्ता ६८९ कोटी ९५ लाख २ हजार ३२७ रुपये इतकी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे एकाही बँकेचं किंवा अन्य कोणाचंही कर्ज आपल्यावर नसल्याचं, निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात पराग शहा यांनी म्हंटलेय.


प्रभाग क्रमांक १३२ मध्ये पराग शहा यांचा सामना, शिवसेनेचे सुधाकर पाटील आणि काँग्रेसचे प्रवीण छेडा यांच्याशी रंगणार आहे. धनापेक्षाही सामाजिक जाण असल्यानं समाजसेवेसाठी आपण राजकारणात आलो असल्याचं पराग शहा यांनी म्हटले आहे.