मुंबई : शहरातील खड्ड्यांचा मुद्दा आज महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीतही जोरदार गाजला. खड्ड्यांच्या विषयावर प्रशासन पूर्णपणे निरूत्तर झाल्याचं पाहायला मिळाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत किती खड्डे आहेत. रस्त्यांची स्थिती काय आहे याबाबत आढावा घेऊन रिपोर्ट सादर करण्याचे आदेश मागच्या बुधवारी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी दिले होते. पण हा रिपोर्ट प्रशासनाने सादरच केला नाही. त्यामुळे सर्वपक्षीय रोषाला प्रशासनाला तोंड द्यावं लागले.


खड्डे बुजवले नाही आणि खड्ड्याच्या प्रश्नावर उत्तर दिलं नाही तर आयुक्तांनाच खड्ड्यात उभं करू असा इशारा मनसेनं दिलाय. तर ज्या कंत्राटदारांनी खड्डे भरले नाही, त्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची मागणी स्थायी समितीत भाजपने केली आहे.


तर आयुक्त अजोय मेहता यांना मुख्यमंत्र्यांनी परत बोलवावे, अशी मागणी शिवसेनेनं केली. पालिका आयुक्तांवरच अविश्वास आणण्याची वेळ आल्याचं स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे म्हणाले.