मुंबई :  मुंबई पोलिसांकडून लवकरच 'प्रतिसाद' हे सेफ्टी अॅप लाँच करण्यात येणार आहे. या अॅपद्वारे संकटात सापडलेल्या महिलेची मदत करण्यासाठी पोलिस अवघ्या ७ मिनिटांत पोहचू शकतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अॅपची मूळ कल्पना राज्याचे पोलिस महानिरीक्षक प्रवीण दिक्षित यांना सुचली होती, येत्या सोमवारी हे अॅप लाँच करण्यात येणार आहे. 


'महाराष्ट्रातील इतर काही भागांमध्ये हे अॅप यापूर्वीच लाँच करण्यात आले होते आणि पुढील आठवड्यात ते मुंबईत येईल. मुंबईप्रमाणचे संपूर्ण राज्यात हे अॅप लाँच करून महिलांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल' असे दीक्षित यांनी सांगितले. 


देशातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना अद्याप कायम असून भारताची आर्थिक राजधानी मुंबईही याला अपवाद नाही, म्हणून महिलांच्या अधिक सुरक्षेसाठी हे अॅप लॉन्च करण्यात येणार आहे.