राणीच्या बागेतल्या पेंग्विनचा मृत्यू
मुंबईतल्या जिजामाता प्राणीसंग्रहालयात खास परदेशातून आणलेल्या पेंग्विनपैकी एकाचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : मुंबईतल्या जिजामाता प्राणीसंग्रहालयात खास परदेशातून आणलेल्या पेंग्विनपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. राणीच्या बागेमध्ये परदेशातून आठ पेंग्विन आणले होते. यातल्या कोरियामधून आणलेल्या मादी पेंग्विनचा मृत्यू झाला.
यकृतात संसर्ग झाल्यामुळे, या मादी पेंग्विनवर उपचार सुरु होते. मात्र उपचारा दरम्यान पेंग्विनचा मृत्यू झाला. दरम्यान इतर 3 नर आणि 4 मादी पेंग्विन निरोगी असल्याचं सांगण्यात आलंय. थंड हवामानात आढळणारे पेंग्विन मुंबईत आणणं हे युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचं स्वप्न होतं. पेंग्विनना मुंबईतलं वातावरण मानवेल का, यावर त्यावेळी बरेच तर्कवितर्क लढवले गेले होते.