मुंबई : समुद्रात फसलेल्या बोटीवरील चौघांना वाचवण्यात नेव्हीला यश आलंय. काल रात्री सोनिका नावाची छोटी बोट राजभवनासमोरील समुद्रातल्या खडकावर आपटली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओहोटीदरम्यान, ही दुर्घटना घडली. त्यानंतर या बोटीत पाणी भरायला सुरुवात झाली. शिवस्मारकासाठी प्रस्तावित असलेल्या जागेच्या जवळच हे घडलं. बोटीवरच्या कर्मचा-यांना वाचवण्यासाठी पोलिसांची एक लॉन्च समुद्रात रवाना झाली. 


मात्र उथळ पाणी आणि खडकांमुळं पोलिसांना त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नव्हतं. अखेर नेव्हीला पाचारण करण्यात आलं. रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी नेव्हीच्या सी हेलिकॉप्टरनं आयएनएस शिक्रावरून उड्डाण केलं आणि काही मिनिटांमध्ये म्हणजे नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बोटीत अडकलेल्या सर्वांची सुटका झाली.