मुंबई : शिवसेनेच्या नगरसेविका शितल म्हात्रे यांनी सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिलाय.शिवसेने भाजपची सत्ता असलेल्या मुंबई पालिकेच्या एकाही शाळेत आपत्कालीन व्यवस्थापन योजन नसल्यामुळे विद्य़ार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे असल्याचा आरोप नगरसेविका शितल म्हात्रे यांनी केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत पालिकेच्या ११२७ शाळा आहेत. त्यात सुमारे साडेतीन लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचं काय असा  प्रश्न शितल म्हात्रे यांनी शिक्षण विभागाला विचारला. त्यानंतर सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी शिक्षण विभागाला धारेवर धरलं.


प्रशासनाकडे याप्रश्नावर ठोस उत्तर नाहीये. यासंबंधात प्रशासनाला उपाय योजन्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती शिक्षण समिती अध्यक्षांनी दिलीय.