मुंबई : मुलुंड, मुंबई सेंट्रल, विलेपार्ले येथे रेल्वे बॉम्ब स्फोट घडवून आणण्यात आले. यात तीन निर्दोष सुटले तर दहा दोषी आढळले. या १० जणांच्या शिक्षेचा आज फैसला होणार आहे. आज बुधवारी सत्र न्यायालयातील 'पोटा' न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोषींपैकी प्लॅन्टर मुज्जमिल अन्सारी याचा सहभाग सर्वाधिक असल्याने त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी अशी विनंती सरकार पक्षातर्फे मंगळवारी करण्यात आली. तब्बल १४ वर्षांनी या खटल्याचा न्या. पी. आर. देशमुख यांनी २९ मार्च रोजी निकाल दिला.


 


स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया ​(सिमी) या संघटनेचा माजी सचिव साकीब नाचन याच्यासह दहा आरोपींना दोषी ठरविले. तिघांना सबळ पुराव्याअभावी सोडून देण्यात आले. या बॉम्बस्फोटात १२ जण ठार झाले होते. तिन्ही बॉम्बस्फोट २००२ व २००३ मध्ये झाले होते. 


दरम्यान, आरोपींनी दीर्घकाळ तुरुंगात काढला असल्याने त्यांना दया दाख​वावी, असे आवाहन त्यांच्या वकिलांनी केले. त्यानंतर विशेष सरकारी वकील रोहिणी सालियन यांनी मंगळवारी युक्तिवाद केला. आरोपींचे गंभीर कृत्य लक्षात घेता त्यांच्यावर दया दाखवू नये, असे त्या म्हणाल्यात.


प्लॅन्टर मुज्जमिल याला फाशीची शिक्षा द्यावी तर साकीब नाचन, गुलाम कोटल, फऱ्हान खोत आणि डॉ. वाहिद अन्सारी यांना जन्मठेप देण्यात यावी, अशी मागणी केली.