मुंबई : मुंबईसह वसई-विरारमध्ये चोरी करुन चोरटा चक्क सरपंच झाला. चोरी करण्यासाठी उत्तर प्रदेश ते मुंबई असा विमानाने प्रवासही कराचया. त्याने चोरीच्या  जीवावर करोड रुपयांची माया जमविली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईमध्ये चोरी करुन उत्तर प्रदेशमध्ये जमा केली करोडो रुपयाची संपत्ती. अशाच एका माजी सरपंच अट्टल चोराराला वसईतील माणीकपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडू अनेक घरफोड्यांची उकल होण्याची शक्यता आहे. 


गावामध्ये प्रतिष्ठेची झालर..


हा चोरटा उत्तर प्रदेशातील एका गावचा माजी सरपंच आहे. त्याचे नाव अस्लम इस्त्राईल शेख आहे. २०१० ते २०१५ या कालावधीत अस्लम हा उत्तर प्रदेशातील प्रतापगडमधील रामपूर रजवाडा गावचा सरपंच होता. गावामध्ये प्रतिष्ठेची झालर पांघरुन मुंबईत अतिशय चलाखीने तो घरफोडी करायचा. 


मुंबईमध्ये घरफोडी करण्यासाठी तो उत्तर प्रदेशवरुन विमानाने मुंबईला ये जा करीत होता. ११ जानेवारी २०१६ मध्ये वसईतील साईनगर येथे त्याने साठ हजाराची चोरी केली. त्यानंतर त्यांने उत्तर प्रदेश गाठले. चोरी करताना तो सीसीटीव्हीत कैद झाला होता. येथेच त्याचे बिंग फुटले. माणीकपूर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे त्याची ओळख पटवून उत्तर प्रदेशातील अलहाबाद येथून त्याला अटक केली.


चोरीची अशी शक्कल


वसई विरार, नालासोपारा, उल्हासनगर, ठाणे, भिवंडी, सह मुंबई परिसरात अस्लम शेखवर अनेक गुन्हे दाखल आहेत. इमारतीची पूर्ण पाहाणी करायचा. हाय प्रोफाईलचे कपडे परिधान करुन तो इमारतीत घुसायचा. जेणे की वाचमनला त्याचा संशय येऊ म्हणून. 


जीन्यावरुन ज्या घराचे दार बंद आहे. अशा दाराची तो बेल वाजवून वरच्या मजल्यावर जायचा. दाराला कुलूप आहे. बेल वाजवूनही कोणी दार उघडले नाही, याची खात्री पटली की तो दोन ते तीन सेकंदात दाराचे कुलूप किंवा स्लॅश तो तोडून प्रवेश करायचा आणि दहा ते पंधरा मिनिटात चोरी करुन फरार व्हायचा. चोरीचा अंदाज शेजाऱ्यालाही याचचा नाही.


विमानाने उत्तर प्रदेशला


मागील अनेक वर्षांपासून तो या परिसरात चोऱ्या करीत होता. परिसरात दोन किंवा तीन चोऱ्या करुन तो लगेच विमानाने उत्तर प्रदेशला निघून जायचा. त्याच्याकडे एक स्कार्पिओ, एक झायलो अशा दोन गाड्या, एक हॉटेल, २० दुकाने अशी संपत्ती आहे. हे पोलीस तपासात पुढे आले.


सीसीटीव्हीत कैद झाली...


वसईतील साईनगर भागात हा चोरटा सरपंच सीसीटीव्हीत कैद झाला आणी त्याचे बिंग फुटले माणीकपूर पोलिसांच्या टीमने दोन वेळा याला पकडण्यासाठी उत्तरप्रदेश गाठलं. पण यश आले नव्हते. पण गावतला प्रतिष्ठीत नागरिक असल्याने त्याला पकडणे पोलिसांन समोर मोठे आव्हान होते. शेवटी उत्तर प्रदेशातील स्पेशल टास्क फोर्सची मदत घेऊन माणीकपूर पोलिसांनी अस्लम शेखला बेड्या ठोकल्या. 


सध्या चड्डी बनियन गॅंग, सुशक्षित पेहरावातील गॅंग यांच्या धुमाकूळ सुरुच असून नागरिक हैराण झाले आहेत. आता शाही चोरही सक्रिय झाले झाल्याने नागरिक भीतीच्या छायेत आहेत.