अंधांचे मंत्रालयाबाहेर जोरदार आंदोलन, वाहतूक खोळंबली
राज्याच्या मुख्य कारभार ज्या इमारतीमधून चालतो, त्या मंत्रालयाबाहेर अंध व्यक्तींनी आज जोरदार आंदोलन करून हा परिसर दणाणून सोडला.
मुंबई : राज्याच्या मुख्य कारभार ज्या इमारतीमधून चालतो, त्या मंत्रालयाबाहेर अंध व्यक्तींनी आज जोरदार आंदोलन करून हा परिसर दणाणून सोडला.
यावेळी तब्बल 20 मिनिटं मंत्रालयासमोरील एका बाजूची वाहतूक या अंध मोर्चेक-यांनी रोखून धरली. सुमारे 25 अंध व्यक्तींनी अचानक पुकारलेलं आंदोलन आणि त्यात पाऊस यामुळं आंदोलकांना आवरताना पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.
संजय गांधी पेंशन योजनेमध्ये पैसे वाढवून द्यावेत आणि पैसे थेट बँकेत जमा करावेत या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं.