तरुणीवर बलात्कार, सुटकेच्या प्रयत्नात पाचव्या मजल्यावरून कोसळली
दक्षिण मुंबईत 27 वर्षीय एका महिलेवर कथित रुपात सामूहिक बलात्काराची घटना घडलीय. बलात्कारानंतर स्वत:ची सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात या महिलेचा तोल जाऊन ती इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली पडली आणि गंभीर जखमी झाली.
मुंबई : दक्षिण मुंबईत 27 वर्षीय एका महिलेवर कथित रुपात सामूहिक बलात्काराची घटना घडलीय. बलात्कारानंतर स्वत:ची सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात या महिलेचा तोल जाऊन ती इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली पडली आणि गंभीर जखमी झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आलीय. पायधुनी भागात शुक्रवारी पहाटे ही तरुणी जखमी अवस्थेत असल्याची सूचना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तिला सरकारी हॉस्पीटलमध्ये भरती केलं.
ही तरुणी उत्तरप्रदेशची रहिवासी आहे. आपल्या एका ओळखीच्या व्यक्तीसोबत ती पायधुनीच्या एका इमारतीत दाखल झाली होती. या व्यक्तीनं काम मिळवून देण्याच्या बहाण्यानं तिला इथंवर आणलं होतं. इथं तिच्यावर दोन अनोळखी लोकांनी बलात्कार केला.