मुंबई: मुंबईत मालाडमध्ये एक धक्कादायक घटना घडलीये. एका खासगी कोचिंग क्लासमध्ये गृहपाठ केला नाही, म्हणून 2 विद्यार्थ्यांना चक्क नग्न करून वर्गाबाहेर उभं राहण्याची शिक्षा देण्यात आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाचवी-सहावीचे हे विद्यार्थी आहेत. श्री ट्युटोरियल्स नावाच्या या कोचिंग क्लासमध्ये हा संतापजनक प्रकार घडलाय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर क्लासविरोधात तीव्र संतापाची भावना आहे.


दरम्यान क्लासचे चालक गणेश नायर आणि सरोज नायर यांनी झी मीडियाशी बोलताना या प्रकाराबाबत माफी मागितलीये.