मुंबई : राज्यात नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेला चांगले यश मिळाले आहे. या विजयाचे श्रेय मी माझ्या शिवसैनिकांना देतो, असे सांगत मी निवडणूक प्रचारात उतरलेला नाही. सच्चा शिवसैनिकाची ताकद काय असते, हे दाखवून दिले आहे. तसेच शिवसेनेवर विश्वास दाखविणाऱ्या जनतेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धन्यवाद दिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेकडून जनतेला खास आश्वसनांची खैरात केली गेली नव्हती. किंबहुना खोटी आश्वासने दिली गेली नव्हती, तरी आम्हाला भरघोस यश आमच्या पदरात टाकले. या जनतेला मनापासून धन्यवाद. युतीचा विषय माझा नाही, तुम्हाला माहिती आहे कोणाची कुठे कुठे युती झाली होती ते. शिवसेनेची युती फक्त आणि फक्त भाजपशी झाली होती. काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये स्थानिक आघाड्यांशी झाली असेल, त्यापेक्षा अन्य कोणत्याही पक्षांशी शिवसेनेची युती नव्हती, असे उद्धव म्हणालेत.


महापालिकेत भाजप नंबर एकचा पक्ष राहील असं मुख्यमंत्री म्हणाले त्यावर त्यांना माझ्या शुभेच्छा असे सूचक विधान उद्धव यांनी केले. विदर्भामध्ये आम्ही कमजोर आहोत, तिथे मी जातीने लक्ष घालणार आहे. शिवसैनिकांनी कमाल केली आहे. भाजपला जास्तीत जास्त यश विदर्भातून मिळाले आहे. उर्वरित महाराष्ट्रात शिवसेनेच्या 25 ते 26 नगराध्यक्ष आलेत तर विदर्भात 5 नगराध्यक्ष आलेत. प्रत्येक ठिकाणी भाजपने वेगवेगळ्या पक्षांशी युती केली. त्यामुळे भाजपला यश मिळाल्याचे उद्धव ठाकरे म्हणालेत.