प्रत्युषा प्रकऱणावरुन नाना मीडियावर भडकले
गेल्या काही दिवसांपासून टीव्ही, सोशल मीडियावर बालिका वधू मालिकेतील अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणावर जोरदार चर्चा होतेय. प्रत्युषाच्या आत्महत्या प्रकरणातील रोज होणारे नवे नवे खुलासे अतिशय रंगवून मीडियावर दाखवले जातायत.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून टीव्ही, सोशल मीडियावर बालिका वधू मालिकेतील अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणावर जोरदार चर्चा होतेय. प्रत्युषाच्या आत्महत्या प्रकरणातील रोज होणारे नवे नवे खुलासे अतिशय रंगवून मीडियावर दाखवले जातायत.
याप्रकरणावरुन अभिनेते नाना पाटेकर यांनी मीडियावर नाराजी व्यक्त केलीये. एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी प्रत्युषाचा मृत्यू अतिशय दुर्देवी आहे. हे प्रकरण रोज मीडियामध्ये दाखवले जाते. मात्र त्या शेतकऱ्यांचे काय जे दररोज आत्महत्येचा मार्ग पत्करतायत. त्यांचे जीवन आपल्यासाठी महत्त्वाचे नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
प्रत्युषाच्या मृत्यूला दोन आठवडे झालेत आणि मीडियामध्ये अद्याप दररोज नवनवीन खुलासे रंगवून दाखवले जातायत. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणांकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केलीये.