नवी दिल्ली : वेगळ्या विदर्भाचा प्रस्ताव खासदार नाना पटोलेंनी लोकसभेत मांडला आणि त्याचे पडसाद राज्यात उमटले. दरम्यान स्वतंत्र विदर्भाची मागणी ही विदर्भातल्या सामान्य जतनेचा आवाज असल्याचं, नाना पटोलेंनी म्हटलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


तर, दुसरीकडे विधानभवनात महाराष्ट्र कायम अखंड राहण्यासाठी विरोधक आक्रमक झालेत. विधानसभा आणि विधानपरिषदेत या मुद्यावरून विरोधी पक्षांनी घोषणाबाजी केली.


वेगळ्या विदर्भाचा प्रस्ताव भाजप खासदार नाना पटोलेंनी लोकसभेत मांडला. त्यावर राज्यातल्या सरकारची नक्की काय भूमिका आहे. याबाबत सरकारने निवेदन करावं, अशी विधान परिषदेत विरोधकांची मागणी होती.


शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनीदेखील चर्चेची मागणी केली आहे. या विषयावर सत्ताधाऱ्यापैंकी कुणी उठून उत्तर देणार का? असा टोमणा नारायण राणेंनी मारल्यावर गिरीश बापटांनी बैठक घेऊन चर्चा कधी करायची हे ठरवू, असं उत्तर दिलं. 


पण त्यामुळे विरोधकांचं समाधान झालं नाही. त्यांनी वेलमध्ये येऊन सरकारविरोधी घोषणाबाजी केली. विधानपरिषदेत कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. 


विधान परिषदेतही यामुद्द्यावरून गदारोळ झाला. वेलमध्ये आलेल्या भाजपचे आमदार वेगळ्या विदर्भाच्या घोषणा देत होते. त्यामुळे संतापलेले परिवहन मंत्री दिवाकर रावते आमदारांवर धावून गेले.