मुंबई : तब्बल 2 वर्षांनंतर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते नारायण राणे यांनी विधीमंळमंडळात कमबॅक केलंय. गेल्या विधानसभा निवडणुकीत दोनदा पराभव पत्करलेल्या राणेंनी अखेर मागच्या दरवाजातून म्हणजे विधानपरिषदेत प्रवेश मिळवला. त्यामुळं या अधिवेशनात राणे सरकारविरोधात काय भूमिका घेतात याकडेच सर्वांचं लक्ष्य लागलं होतं.


कोपर्डीच्या मुद्यावरून नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या गृहखात्याला टार्गेट केलं. नागपूरच सुरक्षित नाही तर राज्याचं काय ? असा सवाल राणेंनी केला.