मुंबई : काँग्रेस आघाडीने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता, पण या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्यानेच मराठा समाजात अस्वस्थता आहे. त्यातून सध्या मोर्चाना प्रतिसाद मिळत आहे, असे प्रतिपादन नारायण राणे यांनी केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठा, धनगर आणि मुस्लीम आरक्षणाबाबत राज्य सरकार अजिबात गंभीर दिसत नाही. न्यायालयाने स्थगिती दिली असली तरी कायदेशीर मार्ग काढण्याकरिता सरकार काहीच प्रयत्न करीत नाही. यातूनच मराठा समाजात नाराजी पसरली आहे, असे राणे म्हणालेत.


मराठा समाजाचे मोर्चे निघत असले तरी राजकीय नेत्यांच्या पाठिंब्याशिवाय एवढे मोर्चे निघणेच शक्य नाही. अगदी सत्ताधारी पक्षातील नाराज मंडळींचे पाठबळ असू शकते. यामागे कोणकोण नेते आहेत याची नावे योग्य वेळी जाहीर करीन, असा इशाराही राणे यांनी दिला.