मुंबई : ५०० आणि १ हजारांच्या नोटा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा फटका अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमलाही बसला आहे. खंडणी, अमली पदार्थींची तस्करी आणि बनावट नोटा तयार करणाऱ्या दाऊदने हजार आणि पाचशेच्या नोटांमध्ये जमा केलेली ही काळी माया एका रात्रीत रद्दीत जमा झाली. या निर्णयामुळे दाऊद आणि त्याच्या मदतीवर चालणाऱ्या दहशतवादी संघटनेचे कंबरडे मोडले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर. खून, खंडणी, अंमली पदार्थांची तस्करीसोबतच बनावट नोटांचा काळाबाजार हा दाऊदच्या डी गँगचा प्रमुख धंदा होता. मात्र केंद्र सरकारने एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा एका रात्रीत रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे दाऊदच्या साम्राज्याला जबर फटका बसला आहे. दाऊद इब्राहिम आपल्या हस्तकांमार्फत बांधकाम व्यवसायात मोठ्या प्रमाणात काळापैसा गुंतवला आहे. मात्र सरकारच्या या निर्णयामुळे त्याच्या या व्यवहारांना लगाम लागणार आहे. 


असा बसणार हादरा?


- 500, 1000ची नोटा रद्द केल्यामुळे दाऊदला फटका, अंडरवर्ल्डच्या व्यवहाराला बसली खीळ
- अब्जावधी रुपयांच्या बनावट नोटांची रद्दी
- अमली पदार्थ तस्करीत दाऊदला कोटींचा फटका 
- अवैधशस्त्र तस्करीत 'डी गॅंग'ला कोट्यावधीचं नुकसान 
- 'डी गॅंग'ला खंडणी मिळणं कठीण  
- सरकारच्या या निर्णयामुळे चोहोबाजूने डी गँगची नाकाबंदी झाली आहे.
 
भारतीय सीमांवर आणि भारतात दहशतवादी हल्ले करणा-यांच्या खात्मा करण्यासाठी विशेष करुन मोदी सरकारने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. कारण याच दहशतवादी संघटना दाऊदमार्फत बनावट आणि काळ्या पैशांचा व्यवहार करुन कोट्यावधी रुपयांचे फंडिंग मिळवत होत्या. 
ज्याकरिता ५०० आणि १००० च्या नोटांचाच वापर केला जायचा आता याच नोटा बंद झाल्याने या दहशतवादी संघटनांचे सर्व व्यवहार ठप्प झालेत. यामुळे आता पैशांच्या जोरावर चालणा-या या दहशतवादी संघटनांनी पैशांसाठी आता दाऊद सारख्या अंडरवर्ल्ड गॅंगवर दबाव आणायला सुरूवात केली असून, दाऊद आणि दहशतवादी संघटनांमध्ये एका रात्रीत खटके उडायला सुरूवात झाली आहे.


सध्या दाऊदला त्याचं शरीर साथ देत नाही तसेच त्याचे खास हस्तक तुरुंगात असल्यामुळे दाऊद जेरीस आला आहे. त्यात सरकारने हजार आणि पाचशेच्या नोटा बंद केल्यामुळे डी गॅंगचं कंबरडं मोडलं आहे.