मुंबई : नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदली प्रकरणी महापौर सुधाकर सोनावणे आणि सर्वपक्षीय गटनेत्यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दरम्यान, अविश्वास ठराव प्रकरणात गरज भासल्यास मुख्यमंत्र्यांना भेटणार, असे आश्वासन उद्धव यांनी शिष्टमंडळाला दिले. तर दुसरीकडे महापौर सुधाकर सोनावणे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी त्यांना पदावर कायम ठेवले आहे. त्यामुळे नाराज असलेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी ही भेट घेतली. उदधव ठाकरेंची नवी मुंबई महापौर सुधाकर सोनावणे आणि काँग्रेस - राष्ट्रवादी गटनेत्यांनी घेतली भेट घेतली. यावेळी नवी मुंबई आयुक्त तुकाराम मुंढे प्रकरणात शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेसाठी महापौर यांनी आभार मानलेत.


दरम्यान, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला असला तरी त्यांनाच महापालिका आयुक्तपदी कायम ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मुंढे हे कार्यक्षम अधिकारी असल्याचे नमूद करत त्यांची बदली करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावली आहे. त्यामुळे या भेटीगाठीच्या हालचाली सुरु झाल्यात.