नवी मुंबईकरांचं तुकाराम मुंडेंच्या समर्थनार्थ वॉक फॉर आयुक्त अभियान
पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणल्याने, नवी मुंबईकरांनी तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ सेव्ह मुंढे आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनातून काही नवी मुंबईकरांनी वाशी रेल्वे स्थानकाजवळ जमून, वॉक फॉर आयुक्त हे अभियान राबविलं.
नवी मुंबई : पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणल्याने, नवी मुंबईकरांनी तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ सेव्ह मुंढे आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनातून काही नवी मुंबईकरांनी वाशी रेल्वे स्थानकाजवळ जमून, वॉक फॉर आयुक्त हे अभियान राबविलं.
'संडे हो या मंडे, आयुक्त हवेत मुंढे' असे फलक हातात घेत या नागरिकांनी घोषणा दिल्या. मुंढें सारखे प्रामाणिक अधिकारी नवी मुंबईत हवेत असं मत या आंदोलकांनी व्यक्त केलं.