मुंबई : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. रोखठोक कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रवादीला खडे बोल सुनावलेत. त्याचवेळी भाजपच्या फायद्यासाठी काँग्रेस सरकार पाडल्याचा गंभीर आरोप चव्हाण यांनी यावेळी केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसने केलेले सर्व आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी खोडून काढले. सिंचन घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांची एसीबीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्याच तत्कालीन गृहमंत्र्यांनी घेतला होता, असा खळबळजनक गौप्यस्फोट चव्हाण यांनी केला. 


राष्ट्रवादीमधल्या अंतर्गत वादातूनच हे घडलं असावं, असं सूतोवाचही त्यांनी केले. एवढंच नव्हे तर ऐन निवडणुकींच्या तोंडावर पाठिंबा काढून घेऊन राष्ट्रवादीने माझे सरकार पाडले. भाजपचा फायदा करून देण्यासाठीच आपलं सरकार पाडण्यात आले, असा घणाघाती आरोप देखील चव्हाणांनी यावेळी केला.