राष्ट्रवादीच्या बैठकीत विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत रणनीती
विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत रणनीती ठरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रमुख नेत्यांची बैठक ठरली. काँग्रेसला केवळ एक जागा देण्याबाबत निर्णय झाला.
मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत रणनीती ठरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रमुख नेत्यांची बैठक ठरली. काँग्रेसला केवळ एक जागा देण्याबाबत निर्णय झाला.
जागा वाटपाबाबत चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठकीत विधानपरिषदेबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यासाठी आणि पुढील भूमिका स्पष्ट करण्यासाठी ठरले. आज संध्याकाळपर्यंत विधानपरिषदेच्या जागांचा निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.
राज्य सरकारला अल्टीमेटम
दुष्काळी भागातील विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसनं ५ जून पर्यंतचा अल्टीमेटम दिलाय त्यानंतर ७ जूनला मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात शेतकऱ्यांना घेऊन धरणं आंदोलन केलं जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेते या बैठकीला हजर होते.