मुंबई :  शिवसेना राज्यातील सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यावर राष्ट्रवादी त्यांना पाठिंबा देणार असा संशय चुकीचा आहे. राष्ट्रवादी कधीही भाजपसोबत जाणार नाही असे राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हापासून राष्ट्रवादी ही शेतकऱ्यांची भूमिखा मांडत आहे. पहिल्यापासून राष्ट्रवादीने सेक्युलर राजकारण केले आहे.  पवार साहेबांनी नेहमी पुरोगामी विचारांचे निर्णय घेतले आहे. त्यामुळे आम्ही कधीही भाजपसोबत जाणार नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. 


शरद पवारांच्या पद्मविभूषणावर बोलले अजित पवार 


शरद पवारांना पद्मविभूषण हा पुरस्कार उशीराने मिळाला, अशी खंत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवली. 


शरद पवार यांनी राजकारणात ५० वर्ष पूर्ण केली. त्यांनी त्यापूर्वीपासूनच कामाला सुरूवात केली आहे.  मिळालेल्या पुरस्काराबद्दल  चुकीचा की वाईट बोलू नये, पण उशीर झाला. क्रीडा, कृषी, उद्योग, रोजगार निर्मिती क्षेत्रात मोठे काम केले आहे. त्यामुळे त्यांना यापूर्वीच पुरस्कार मिळायला पाहिजे होता.