शिवसेना नाही तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष
राज्यात झालेल्या १४७ नगरपालिका आणि १७ नगर पंचायतींच्या निवडणुकांच्या निकालाचा अधिकृत डाटा निवडणूक आयोगाने दिलेला नाही. त्यामुळे, माध्यमांनी 4 नंबरचा पक्ष राष्ट्रवादीला ठरविले हे चुकीचे आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे.
मुंबई : राज्यात झालेल्या १४७ नगरपालिका आणि १७ नगर पंचायतींच्या निवडणुकांच्या निकालाचा अधिकृत डाटा निवडणूक आयोगाने दिलेला नाही. त्यामुळे, माध्यमांनी 4 नंबरचा पक्ष राष्ट्रवादीला ठरविले हे चुकीचे आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे.
राष्ट्रवादी पक्ष हा या राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. 19 ठिकाणी राष्ट्रवादी चिन्हावर नगराध्यक्ष निवडून आले आहेत तर 8 ठिकाणी राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडीचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत.
अशा प्रकारे एकूण 27 ठिकाणी राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत.
भाजपाला ८१५ आणि राष्ट्रवादीचे चिन्हावर ६८४ आणि आघाडीचे १६६ मिळून ८५० नगरसेवक निवडून आले आहेत. एम् आय एम् च्या खांद्यावर हात ठेऊन भाजप ने या निवडणुका जिंकल्याचा आरोपही नबाब मलिक यांनी केला.
सत्तेचा वापर करत विभाग रचना, आरक्षण घोषणा करण्यात आली. निवडणुकीत भाजपाने मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप केले. आताच्या निवडणुकीत भाजपच्या मतदानात घट झाली आहे.
आघाडी करण्याची आमची इच्छा आहे पण काँग्रेसमध्ये एकवाक्यता नाही, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.