मुंबई : राष्ट्रीय पक्षांची दादागिरी संपवण्यासाठी केंद्रीय पातळीवर प्रादेशिक पक्षांनी एकत्र येण्याची गरज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे. वेळ आली तर आपण प्रादेशिक पक्षांच्या आघाडीच्या निमंत्रकपदाचीही जबाबदारी स्वीकारू असंही त्यांनी झी 24 तासच्या रोखठोक मुलाखतीत सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना भाजप सोबत केंद्रात आणि राज्यात सत्तेत असूनही विरोधकांप्रमाणे वागते आहे. केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी, फडणवीस सरकारवर सतत शिवसेनेकडून टीका सुरु आहे. आता युती तुटल्यानंतर ती हा विरोध आणखीन तीव्र झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी आता युतीचा प्रश्न उरलाच नसल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्षांना बाजुला करुन प्रादेशिक पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न त्यांच्यांकडून सुरु झाला आहे.


पाहा काय बोलले उद्धव ठाकरे