मुंबईत सार्वजनिक शौचालय शोधण्यासाठी अॅप
मुंबईतील सार्वजनिक शौचालये शोधण्यासाठी मुंबई महापालिकेने मुंबई टॉयलेट लोकेटर अॅप तयार केलंय.
मुंबई : मुंबईतील सार्वजनिक शौचालये शोधण्यासाठी मुंबई महापालिकेने मुंबई टॉयलेट लोकेटर अॅप तयार केलंय. मोबाईल अॅपच्या आधारे जवळचं शौचालय मुंबईकरांना शोधता येणार आहे. खासकरून या अॅपमुळे महिलांची गैरसोय दूर होणार आहे.
हे अॅप अॅन्ड्रॉईड मोबाईलवर उपलब्ध आहे. या अॅपचं अनौपचारिक उद्घाटन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते करण्यात आलं. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 800 सशुल्क सार्वजनिक शौचालयं सध्या या अॅपला जोडण्यात आलीत. तर इतरही सार्वजनिक शौचालयं या अॅपला लवकरच जोडण्यात येणार आहेत.