कृष्णात पाटील, मुंबई : बँक बे आगारात नव्या कोऱ्या बसेस मुंबईकरांसाठी सज्ज आहेत. अत्याधुनिक आणि दणकट अशा टाटा कंपनीच्या या नव्या बस असून यामध्ये प्रवाशांसाठी अनेक सुविधा दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे या बसेस मुंबईकरांचे आकर्षण ठरणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहमीच तोट्यात चालवाव्या लागणा-या २६६ एसी बसेस बंद करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला असला तरी बेस्टच्या ताफ्यात नव्याको-या ३०३ बसेस दाखल होत आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ७४ बसेस बेस्टमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यांची आरटीओकडे नोंदणी सुरू आहे. 


येत्या आठवडाभरात या नव्या बसेस मुंबईच्या रस्त्यांवर धावताना दिसतील. अत्याधुनिक आणि दणकट अशा टाटा कंपनीच्या या नव्या बस असून यामध्ये प्रवाशांसाठी अनेक सुविधा दिल्या गेल्या आहेत.  


नव्या बसची वैशिष्टये


- ऑटोमेटीक गियर सिस्टीम, 
- प्रवाशांसाठी मोबाईल चार्जिंगची व्यवस्था
- व्हेंटीलेशनसाठी प्रथमच एअर ब्लोअर
- आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी दरवाजा
- ट्यूबलेस टायर
- बसचे रूंद दरवाजे