मुंबईत पार्किंग धोरणानुसार चौपट दर आकारणी
दक्षिण मुंबईत कुलाबा, फोर्ट परिसरातल्या अठरा वाहनतळांवर महापालिकेनं नव्या पार्किंग धोरणानुसार चौपट दर आकारणीला सुरूवात केली आहे. पालिकेचा महसूल वाढवण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचा विरोध होण्याची शक्यता आहे.
मुंबई : दक्षिण मुंबईत कुलाबा, फोर्ट परिसरातल्या अठरा वाहनतळांवर महापालिकेनं नव्या पार्किंग धोरणानुसार चौपट दर आकारणीला सुरूवात केली आहे. पालिकेचा महसूल वाढवण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचा विरोध होण्याची शक्यता आहे.
जनतेनं सार्वजनिक वाहतूकीला प्राधान्य द्याव, यासाठी दक्षिण मुंबईत पार्किंगच्या दरात चौपट वाढण्याचं धोरण दोन वर्षांपूर्वीच सरकारकडे परवानगी मागितली होती. सरकारनं ही मंजूरी दिल्यावर रविवारीही नवे दर लागू केलेत. याआधी कुलाबा आणि फोर्ट परिसरात चारचाकी गाडी पार्क करण्यासाठी ताशी १५ रुपये आकारले जाते होते. आता आज त्यासाठी ताशी 60 रुपये मोजावे लागत आहेत. तर दुचाकीसाठी आतापर्यंत ताशी दोन रुपये मोजावे लागत. आता हा दर पंधरा रुपयांवर नेण्यात आला आहे.