सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी
अंगारकीनिमित्त तुम्ही मुंबईतल्या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाणार असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.
मुंबई : अंगारकीनिमित्त तुम्ही मुंबईतल्या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाणार असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. सुरक्षेच्या कारणांमुळे सिद्धिविनायक मंदिरात हार, फुलं, नारळ घेऊन जाता येणार नाही.
तसंच प्रसादासाठी स्टील बॉक्स नेता येणार नाही, प्लॅस्टिकचाच बॉक्स न्यावा लागेल. पोलीस आणि मंदिर प्रशासनानं सुरक्षासाठी हा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे परिसरातले फूल-हार विक्रेते नाराज झालेत. तर भाविकांनी या निर्णयाचं स्वागत केलं.