मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांच्या आधी मुंबईतल्या खड्ड्यांचं राजकारण चांगलंच तापलं आहे. काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी मुंबईतीली खड्ड्यांच्या फोटोचं प्रदर्शन भरवण्याचा निर्णय घेतला आहे. 12 जुलैला आझाद मैदानाजवळच्या मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेमध्ये हे प्रदर्शन असणार आहे, अशी माहिती नितेश राणेंनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रदर्शनाला नितेश राणेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाही आमंत्रण दिलं आहे, असं नितेश राणे म्हणाले आहेत. नागरिकांनीही या प्रदर्शनाला हजर राहण्याचं आवाहन नितेश राणेंनी केलं आहे. 


मुंबईत फक्त 66 खड्डेच असल्याचा दावा महापालिकेनं केला होता. यानंतर नितेश राणेंच्या कार्यकर्त्यांनी खड्डे मोजा मोहीम आंदोलन केलं होतं. या मोहिमेअंतर्गत काढण्यात आलेल्या फोटोचं हे प्रदर्शन असणार आहे.