मुंबई : केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत येऊन ठाकरे बंधुंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नितीन गडकरी यांनी आधी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर कृष्णकुंजवर जाऊन त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचीही भेट घेतली. 


दोघा ठाकरे बंधुंना गडकरींनी आपल्या मुलीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका दिली. ठाकरे बंधुंशी कोणतीही राजकीय चर्चा केली नसून आपण केवळ लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी आलो असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.