मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता मंत्र्यांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. त्यामुळं नव्या मंत्र्यांना मंत्रालयात कुठं आणि कशी जागा द्यायची असा प्रश्न निर्माण झालाय. सध्या मंत्रालयात केवळ पाच नव्या मंत्र्यांना सामावून घेता येईल एवढीच जागा आहे. 


माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या सहाव्या मजल्यावरील कार्यालयाचे पाच भाग करण्यात येणार आहेत. पण त्यासाठी आणखी कालावधी लागणाराय. परिणामी नव्या मंत्र्यांना मंत्रालयाबाहेरूनच कारभार करावा लागणाराय. पुढील आठवड्यात विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु होतं आहे. त्यामुळं अधिवेशन संपेपर्यंत तिथूनच नव्या मंत्र्यांना कामकाज करावं लागणार आहे. यापैकी काही मंत्र्यांनी विधानभवन कार्यालयातून कामाला सुरूवातही केली आहे.