मुंबई : मुंबई वाहतूक पोलीस दलात भ्रष्टाचार नसल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मुंबई उच्च न्यायालयात सांगितलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई वाहतूक पोलीस विभागात कोट्यवधींचा भ्रष्टाचारा संदर्भात स्टींग ऑपरेशन करुन पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील टोके यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. 


प्रत्येक गुन्ह्यासाठी ट्रॅफिक पोलिसांचं रेटकार्ड ठरलेलं आहे, असा सनसनाटी दावाही टोकेंनी उच्च न्यायालयात केला होता. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने अतिरिक्त पोलीस महासंचालक एसीबी यांना मुंबई आणि इतर वाहतूक विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी करुन अहवाल पुढील ६ आठवड्यात सादर करण्याचे आदेश दिले होते. 


त्यानुसार सुनिल टोके यांच्या याचिकेवर एसीबीने अहवाल सादर केला. या अहवालानुसार एसीबीने २९ जणांची चौकशी करून जबाब नोंदवला. या चौकशीत मुंबई ट्राफिक पोलीस दलात भ्रष्टाचार नसल्याचं उत्तर एसीबीनं दाखल केलंय.


त्यावर याचिकाकर्त्यांनी दिलेल्या व्हिडिओ क्लिप्स तपासून अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सरकारी वकिलांना दिलेत.